राज्य सरकारचा मोठा निर्णय Aadhaar Card यापुढे जन्म तारखेचा पुरावा नाही,

PUNE News आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणे बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतला आहे. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

यामुळे आधार कार्डावर आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

संदेशानुसार, आधार कार्डवर जन्मतारखेचा थेट दाखला जोडलेला नसल्यामुळे त्याला जन्म प्रमाणपत्राचा दर्जा दिला जाऊ शकत नाही. नियोजन विभागाचे विशेष सचिव अमित सिंह बन्सल यांनी सर्व विभागांना आदेश दिला आहे की, आधार कार्डला जन्म प्रमाणपत्र म्हणून स्वीकारले जाऊ नये. तसेच, अनेक राज्य सरकारी विभाग अद्याप जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारत आहेत, त्यामुळे नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे की आता सर्व राज्य सरकारी विभागांना आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा मानू नये, याची योग्य माहिती द्यावी.