राष्ट्रवादीकडून मोठी घोषणा, ७ महापालिका निरीक्षकांची नावे जाहीर

Pune News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठीचे पहिले पाऊल टाकले असून महत्त्वाच्या महापालिकांसाठी निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने महापालिकांची जबाबदारी दिली आहे.

लवकरात लवकर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे अहवाल देण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व निरीक्षकांना केल्या आहेत. पुढच्या तीन ते चार दिवसांत स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन युती आघाडीबाबतचे विश्लेषण पक्षप्रमुखांकडे निरीक्षकांनी करणे अपेक्षित आहे.

कोणत्या महापालिकेसाठी कोण निरीक्षक? राष्ट्रवादीकडून नावे जाहीर
खासदार सुप्रिया सुळे- पुणे महापालिका निवडणूक
अमोल कोल्हे- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक
जितेंद्र आव्हाड- ठाणे महापालिका निवडणूक
जयंत पाटील- सांगली महापालिका निवडणूक
अनिल देशमुख- नागपूर महापालिका निवडणूक
शशिकांत शिंदे- नवी मुंबई महापालिका निवडणूक
अमर काळे- चंद्रपूर महापालिका निवडणूक