पुणे अपडेट न्यूज :: सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुहास भोते व धनश्रीताई भोते यांच्यावतीने मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम
सुसगाव व परिसरात नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, भोर, राजगड, मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या वेळी मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे गंगाराम मातेरे, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, शिवाजीराव बुचडे पाटील, सुसगावचे माजी उपसरपंच आणि भाजपचे युवा नेते सुहास भोते, माजी चेअरमन साहेबराव जाधव, हिंजवडी गावचे माजी उपसरपंच राहुल जांभुळकर, विद्युत वितरण समिती सदस्य युवराज पायगुडे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार संग्राम थोपटे म्हणाले की सुहास भोते आणि धनश्री भोते व हे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी किंवा कोविडचा काळ असो किंवा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे कुटुंब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.