भोडे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार; चक्क गावठाणाची जागा सरपंचाने बळकवली?

मुळशी प्रतिनिधी – (Mulashi news) पुणे जिल्ह्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत रिंग रोडचे काम देखील जोरात सुरू असल्यामुळे शेतकरी जमीन राखताना दिसून येत आहेत;

भोडे ग्रामपंचायत तालुका मुळशीत वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे चक्क ग्रामसेवकाला हाताशी धरून सरपंचांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे अशी तक्रार दत्तात्रय नवस्कर, बाळकृष्ण शेंडगे, व इतर ग्रामस्थांनी केली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी तक्रारदार म्हणाले की; भोडे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी राज्य सरकार व न्यायालयाची देखील फसवणूक केली आहे, अनेक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये सत्ता असल्यामुळे त्यांनी गावठाणाची जमीन ग्रामसेवकाला हाताशी धरून स्वतःच्या नावे केली आहे, 60 वर्षापासून गावठाण तो रस्ता शेत वाहतूक करण्यासाठी व 50 ते 60 घरांची लोक वस्ती असलेल्या रस्त्यांवर जेसीबी आणत उत्खनन करण्यात आले , सर्वे नंबर 91/5 येथील वृक्षतोड देखील करण्यात आली आहे त्यामुळे जवळपास 16 ते 17 लाख भ्रष्टाचार संबंधीत ग्रामपंचायतने केला आहे यावर लवकर चौकशी करून तात्काळ ग्रामसेवक व सरपंचावर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.