मोबाईलच्या युगात मुलांना खेळाची गोडी लावणारा भाग्यश्री सोसायटीचा स्तुत्य उपक्रम – नगरसेविका धनश्रीताई कोल्हे

धायरी प्रतिनिधी -: नांदेड सिटी येथील भाग्यश्री सोसायटीमध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेल्या “इंडोर गेम झोन” या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या नगरसेविका धनश्री दत्तात्रय कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्या म्हणाल्या की, आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात मुलांमध्ये मैदानी व बौद्धिक खेळांविषयीची आवड टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे, हीच बाब लक्षात घेऊन भाग्यश्री सोसायटीने मुलांसाठी इंडोर गेम झोनची संकल्पना प्रत्यक्षात आणत एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे मुलांना आनंददायी व सकारात्मक वातावरण मिळणार असून त्यांच्या मनोरंजनात तसेच बौद्धिक विकासात भर पडणार आहे, यावेळी नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांनी सोसायटीतील सर्व सदस्यांचे आभार मानत, “भविष्यातील पिढी घडवण्यासाठी आपण आज मोठा हातभार लावत आहात. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम काळाची गरज आहेत. भविष्यातही असेच उपक्रम हाती घेऊन मुलांच्या आरोग्य, बौद्धिक विकास आणि संस्कारांबाबत विविध उपक्रम आपण सर्वांनी एकत्रितपणे राबवायला हवेत,” असे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाग्यश्री सोसायटीच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सभासदांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे, भाग्यश्री सोसायटीचे चेअरमन स्वप्निल कार्ले, कलाश्री सोसायटीचे चेअरमन हर्षद घुले, सेक्रेटरी सुरेश कदम, कमिटी सदस्य बापूराव गायकवाड, संदीप बावकर, मधुकर पाटील, श्यामसुंदर येमेवार, डॉ. टिकार, संदीप वाल्हेकर, दिनेश देडगे, सौ. जयश्री सरोदे, रेखा डोंगरवार, विठ्ठल ठाकर, वी. के. जोशी तसेच सोसायटीतील किलबिल परिवार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.