बेडरुम, पैशांनी भरलेली बॅग, संजय शिरसाटांच्या व्हिडीओने खळबळ

Share

पुणे प्रतिनिधी :: राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. यानंतर आता संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ दाखवला आहे.

या व्हिडीओत संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओत संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला एका बॅगेत नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडीओत संजय शिरसाट हे सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसत आहेत. त्यासोबतच या व्हिडीओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसत आहे. सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओवरुन शिंदे गटावर टीका केली आहे. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. माझ्याकडे असलेल्या व्हिडीओत संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हे दिसत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले होते. या व्हिडीओमुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान हा व्हिडीओ समोर येताच संजय शिरसाटयांच्याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. पैशांनी भरलेली बॅग नेमकी कुठून आली? संजय शिरसाट यांच्याकडे पैसे कुठून आले?असा सवालही केला जात आहे.यावरच आता समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती बॅक पैशांनी भरलेली नाही. तिच्यात कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *