पुणे प्रतिनिधी (Pune news)
मुंबईनंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर आहे. पुणे शहरातील बावधन या परिसरात आयटी, उद्योग नगरी, शैक्षणिक संस्था, या भागात आहेत
बावधन या गावाचा झपाट्याने विस्तार झाला नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले मात्र ट्राफिकच्या समस्यामुळे नेहमीच तासंतास ट्राफिकच्या समस्येत गुंतून पडत आहेत, बावधन गावातील ओंकार गार्डन चौक परिसरात सतत होणाऱ्या ट्राफिक समस्या बाबत भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक दगडे, गणेश भाऊ दगडे, मंदार घुले, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामविकास आघाडी मुळशी तालुका, प्रदीप दगडे भेट घेऊन गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत निवेदन देऊन विविध विकासकामंबाबत चर्चा केली व याबाबत अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून लवकर तोडगा काढण्याची आश्वासन आमदार शंकर मांडेकर यांनी दिले.
यावेळी शंकर भाऊ मांडेकर म्हणाले की, ट्राफिकच्या समस्याने सर्वत्र नागरिक हैराण आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा विनिमय करून लवकर यावर मार्ग काढला जाईल, विकास कामासंदर्भात देखील अनेक मागण्या केल्या आहेत त्या देखील लवकर पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले.