पुणे (वार्ताहर) : भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील सुस, माळुंगे, बावधन बुद्रुक, या गावातील विविध नागरी समस्यांबाबत पुणे महापालिकेचे महापालिका आयुक्तांची आमदार शंकर मांडेकर यांनी भेट घेतली.
प्रदीर्घ चर्चा केली यामध्ये विशेषतः सुस हायवे ते सनीज वर्ड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी सविस्तर चर्चा केली,
शहरीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे बावधन बुद्रुक, सुस,माळुंगे, या गावांना नागरी समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली, विज ,पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते, स्ट्रीट लाईट, यावर तातडीच्या उपाययोजना अशा सूचना आमदार मांडेकरांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या सर्व महत्त्वाच्या विषयांमध्ये लक्ष देऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, विशाल विधाते, अमोल चांदेरे, इत्यादी उपस्थित होते.