बाणेर प्रतिनिधी (Pune news) बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गालगत हजार वली शाह दर्गा आणि मशीद आहे. बाणेर येथील ही वक्फ बोर्डाची ७ हेक्टर ३४ गुंठे, म्हणजेच १८ एकर १४ गुंठे भूमी १९ वर्षांपूर्वी दिलेल्या किमतीला आता विकण्यास वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी अनुमती दिली आहे.
आजचा बाजारभाव पहाता ही भूमी अनुमाने ९०० कोटी रुपयांची असून ती अवघ्या साडेनऊ कोटी रुपयांना विकली आहे. वक्फ बोर्डाचा हा निर्णय आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिलेले आदेश आश्चर्यकारक आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुसलमान समाजाकडून होत आहे. या महाघोटाळ्याच्या प्रकरणी मुसलमान समाजाने आवाज उठवावा, असे आवाहन मोहसीन शेख यांनी केले आहे.
या जागेचे वर्ष १८६० पासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. ही जागा विकण्याचा आदेश वर्ष २००६ मध्येही काढण्यात आला होता. त्या वेळी ती जागा ९ कोटी ५० लाख रुपयांना विकण्याचा निर्णय वक्फ बोर्डाने घेतला होता; परंतु त्यातील ७ कोटी रुपये वक्फ बोर्डाला द्यायचे होते. ती रक्कम वर्ष २००९ पर्यंत न दिल्याने वक्फ बोर्डाने तो व्यवहार रहित केला.
या संदर्भात अनेक खटले न्यायालयात प्रविष्ट (दाखल) झाले. न्यायालयाकडून वेगवेगळे आदेश मिळाले; परंतु आता अचानक २७ मे २०२५ मध्ये जुनेद सय्यद या वक्फ मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पत्र लिहून तो १९ वर्षांपूर्वी झालेला अवैध व्यवहार ज्या किमतीला रहित झाला, त्याच किमतीला पुन्हा वैध घोषित केला. १९ वर्षांनंतर या भूमीची किंमत जवळपास ९०० कोटी रुपये आहे.
जागेचे वर्ष १८६० पासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. ही जागा विकण्याचा आदेश वर्ष २००६ मध्येही काढण्यात आला होता. त्या वेळी ती जागा ९ कोटी ५० लाख रुपयांना विकण्याचा निर्णय वक्फ बोर्डाने घेतला होता; परंतु त्यातील ७ कोटी रुपये वक्फ बोर्डाला द्यायचे होते. ती रक्कम वर्ष २००९ पर्यंत न दिल्याने वक्फ बोर्डाने तो व्यवहार रहित केला.
जुनेद सय्यद यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, वक्फ अधिनियम १९९५ च्या तत्कालीन कलम १०८ अनुसार असलेल्या प्रावधानांप्रमाणे अन्य कोणत्याही कायद्यापेक्षा ही प्रावधाने श्रेष्ठ ठरतात. त्यामुळे वक्फ बोर्डाने कलम ५१ अंतर्गत विक्रीस अनुमती दिलेली ही मालमत्ता इनामवर्गातून बाहेर येते आणि ही मालमत्ता ‘फ्री होल्ड लँड’ (भूमीवर मालकाची पूर्ण आणि कायमस्वरूपी मालकी) ठरते. त्यामुळे सर्व शेरे हटवण्यासह ‘भोगवटादार वर्ग’ ‘२ इनामवर्ग ३’, असा शेराही हटवून भूमीच्या ७/१२ उतार्यावर ‘भोगवटादार वर्ग एक’ अशी नोंद करावी.