बाणेर येथील बीटवाईज चौकातील अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधीने केली कामाची पाहणी

बाणेर प्रतिनिधी :: पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपलब्ध असलेला निधी आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन कामाचा क्रम ठरवावा लागणार आहे. वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य या चार बाबींवर काम करण्यास प्राधान्य देत आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

बाणेर येथील बिटवाईज चौकातील ड्रेनेज चेंबर आणि अंतर्गत पाईप याची दुरावस्था झाल्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाणी देखील रस्त्यावर अनेक दिवसापासून वाहत होते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता, त्या परिसरात दुर्गंधी पसरली होती त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आज अधिकाऱ्यांसमवेत बिटवाईज चौकातील ड्रेनेजची पाहणी केली,
पुणे महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत शिंदे, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे, तसेच नासिर तात्या सय्यद, मोहन नगर सोसायटीचे दिनेश भाऊ गायकवाड, दत्तात्रय शिंदे मामा, यश ऑर्चिड सोसायटीचे कमलेश भाऊ काळे, युवराज मामा धनकुडे व महादेव चाकणकर हे मान्यवर उपस्थित होते. यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शकाची पाहणी केली.

सर्विस रोडला पाच ते सहा चेंबर्स महापालिका अधिकारी व ठेकेदारास निदर्शनास आणून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशा देखील सूचना करण्यात आल्या.

बिल्डरला थांबवण्याच्या केल्या सूचना

सर्विस रोडला सर्व रोड जन्म झाल्यामुळे संबंधित बिल्डरला काम होईपर्यंत पाणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.