बाणेर प्रतिनिधी :: पावसाळ्याच्या तोंडावरच बाणेर – बालेवाडी परिसरातील अनेक मुख्य ठिकाणच्या रस्त्यावरील फुटपाथ अनेक दिवसांपासून खोदले गेलेले आहेत त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे, यामुळे परिसरातील नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे,
या पार्श्वभूमीवर पुणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मनोज बालवडकर यांनी पथविभागाचे उप अभियंता दिलीप काळे यांना भेटून निवेदन दिले,
यावेळी मनोज बालवडकर म्हणाले की; बाणेर बालेवाडी परिसरातील फुटपाथ नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे, यामुळे अपघात देखील होऊ शकतात दैनंदिन फिरणाऱ्या वयस्कर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे पथविभागाचे उप अभियंता दिलीप काळे भेटून निवेदन दिले आहे त्यांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले