बालघरे वस्ती, कुदळवाडी येथे वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजनेची करा :: दिनेश यादव

Share

पिंपरी चिंचवड :: कुदळवाडीतील बालघरे वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने महावितरणकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरणचे उपअभियंता श्री. राजेश भगत व स्वी सदस्य दिनेश यादव यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या व वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली.

निवेदनात वस्तीतील वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज येणे, अचानक ट्रिपिंग अशा समस्यांकडे लक्ष वेधून घेतले गेले. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, लघुउद्योग आणि दैनंदिन घरगुती कामांवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी जंयवत बालघरे, उत्तम बालघरे, सागर बालघरे, अनिकेत लांडगे, धनपत यादव, दीपक घन, स्वराज पिजण, रोहिदास वाघमारे,विशाल बनसोडे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

महावितरण अधिकारी राजेश भगत यांनी लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले. स्थानिकांनी त्यांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले असून, लवकरच या समस्येचे समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *