विधानसभेत रोहित पवार-सुरेश धस भिडले; गदारोळाने सभागृह हादरले!

Pune news भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बोलताना जामखेड मतदारसंघाबद्दल काहीतरी बोलून गेल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार भडकले. “उदाहरण द्यायचं असेल तर सांकेतिक द्या, पण आमच्या मतदारसंघाचा अपमान कसा काय करता?” असा थेट सवाल करत त्यांनी धस यांना चांगलंच सुनावलं.

तालिका अध्यक्षांकडे त्या विधानाचा रेकॉर्ड वगळण्याची विनंती केली आणि अध्यक्षांनी ती मान्यही केली. “कर्जत-जामखेड ही पुण्यभूमी आहे, तिची बदनामी कुणी केली तर सहन करणार नाही,” असं पवार यांनी ठामपणे सांगितलं.

शेवटी सुरेश धस यांनीही आपला हेतू मतदारसंघाची बदनामी करण्याचा नसल्याचं सांगत शब्द मागे घेतला. त्यावर जयंत पाटील यांनी हलक्याफुलक्या अंदाजात चिमटा काढत, “मी कुणाचं नाव घेऊन बोललोच नाही… पण ते अंगावर कसं घेतात याचा live demo धस यांनीच दिला,” असं हसत म्हटलं. त्यावर धस यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं.