पुणे प्रतिनिधी :: पुणे महानगरपालिकेच्या वतीने व भोर राजगड मुळशीचे मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून व वामा वुमन्स क्लब यांनी आयोजित केला होता,
या प्रशिक्षण कार्यक्रमात माळुंगे व परिसरातील अनेक महिला भगिनींनी सहभाग घेतला होता,
या प्रशिक्षणात आरी वर्क क्लासेस पूर्ण केलेल्या महिला भगिनींना आज प्रमाणपत्राचे वाटप पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूनम विधाते यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी पूनमताई विधाते म्हणाले की; या उपक्रमामुळे महिला भगिनींना रोजगार निर्माण होण्याचे साधन तयार होत आहे व अशाप्रकारे आणखी विविध उपक्रम भविष्यकाळात आपण आयोजित करणार आहोत, यावेळी त्यांनी प्रमाणपत्र धारक महिलांचे अभिनंदन देखील केले.