महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर

Pune Maharashtra: देशातील ९ राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडणार आहे.

जिष्णू देव वर्मा; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अनुभवी असलेले जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणार आहेत. अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत त्यांच्या अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल आणि जिष्णू देव वर्मा यांच्या पदभार स्वीकृतीबाबत लवकरच अधिकृत लोकभवन पत्रक प्रसिद्ध केले जाईल.

देशभरातील महत्त्वाच्या नियुक्त्या

संपूर्ण देशात झालेल्या या मोठ्या फेरबदलात अनेक अनुभवी नेत्यांना आणि निवृत्त अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहेय

महाराष्ट्र: जिष्णू देव वर्मा (तेलंगणाहून बदली)

दिल्ली (उपराज्यपाल): तरनजीत सिंह संधू (माजी राजदूत)

लडाख (उपराज्यपाल): विनय कुमार सक्सेना (दिल्लीहून बदली)

बिहार: लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन

पश्चिम बंगाल: आर. एन. रवी (तमिळनाडूहून बदली)

तेलंगणा: शिव प्रताप शुक्ला (हिमाचल प्रदेशहून बदली)

हिमाचल प्रदेश: कविंदर गुप्ता (लडाखच्या उपराज्यपाल पदावरून बढती)

नागालँड: नंद किशोर यादव

तमिळनाडू: राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (केरळचे राज्यपाल असूनही तमिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार)