प्रभाग क्रमांक ४ खराडी-वाघोली शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला
वाघोली प्रतिनिधी -: पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा ठसा उमटवणारच असा वज्रनिर्धार आज शिवसैनिकांनी केला, शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ शिवसेना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात मोठ्या जल्लोषात नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी भगव्याचे शिलेदार महापालिकेत मोठ्या दिमाखात जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची यादी वाचली, लाडक्या बहिणींसाठी आपला हक्काचा भाऊ एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शांताराम कटकेसह प्रभाग क्रमांक 4 च्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करावे असे आव्हान देखील त्यांनी केले.
यावेळी रॅलीला भव्य गर्दी पाहायला मिळाली; या भागातील अशी आजी माजी सरपंच उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रिन्सला निवडून देण्यापेक्षा 24 तास काम करणारा नेतृत्व आपल्यामध्ये आहे शांताराम कटके यांच्यासारखा धार्मिक विचाराचा माणूस आपल्याला हवा आहे हे आजच्या गर्दीवरून दिसून येते त्यामुळे पुणे महापालिकेत सक्षमपणे नेतृत्व करण्याची ताकद यांच्याकडे आहे त्यामुळे भविष्यात आपल्या भागातील समस्या निश्चित सोडवल्या जातील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी दिला.
प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व युवकांसाठी संधी या मूलभूत मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“विकास, विश्वास आणि पारदर्शक प्रशासन” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे प्रभाग क्र. ४ मध्ये सकारात्मक वातावरण अधिक दृढ झाले असून, निवडणुकीच्या निकालाच्या दिशेने जनमत एका स्पष्ट व निर्णायक भूमिकेकडे वाटचाल करत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, सातत्याने वाढत असलेली उपस्थिती आणि व्यापक पाठिंबा पाहता, प्रभाग क्र. ४ मधील उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद हा केवळ समर्थनापुरता मर्यादित न राहता, ठोस आणि प्रभावी जनादेशाची नांदी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
