अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

पुणे पुण्यातील बोपोडी भागातील जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. या गैरव्यवहारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा संबंध असल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर (Mahayuti Government) टीकेची प्रचंड झोड उठवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केला आहे. हे झालं तरी जे गुन्हेगारी प्रकरण दाखल झाले आहे, ते संपणार नाही. त्यासंदर्भात ज्या काही अनियिमतता असतील, त्याबाबत कारवाई होईल. माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही (Ajit Pawar) पूर्णपणे सहमत असतील. त्यामुळे अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तर दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात अजित पवार यांची पाठराखण केली आहे. अजित पवार यांनी तेव्हाच थांबवलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. पण बऱ्याचदा कामाच्या व्यापात गोष्टी राहून जातात. अनेक निर्णय परस्पर होतात. आता आपण त्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा स्वत: मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे, त्यानुसार चौकशी होऊन द्यावी. अजित पवार यांचा राजीनामा मागण्यात काहीही अर्थ नाही. विरोधकांना एकच काम आहे, ते काहीही झालं तरी राजीनामा मागतात. राजीनामा मागण्यापेक्षा वास्तव समोर आल्यावर जी मागणी करायची आहे, ती करा, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले