अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं युवक प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

पुणे प्रतिनिधी :: कालच्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिलगिरी व्यक्त केली. कालच्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजयघाडगेपाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातूनसूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. याचा फटका सुनील तटकरे यांच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी खबरदारी म्हणून सूरज चव्हाण यांना आपल्या दौऱ्यातूनवगळल्याची माहिती आहे. परंतु, सूरज चव्हाण यांच्याकडून, माझे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे आपण लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या राड्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी मुंबईलाबोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार सूरज चव्हाण यांना नुसती समज देणार की त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Suraj Chavan: सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान सुरज चव्हाण अजित पवारांच्या आणि सुनील तटकरे यांच्या नावावर जास्त उड्या मारू नका, तुम्हाला महाराष्ट्रभर फिरणं आहे. तसेच सुरज चव्हाण जिथे दिसेल तिथे त्याचा बंदोबस्त करू. शिवाय ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ आणि महाराष्ट्रातले अजित पवारांच्या राष्ट्रवादी सगळे कार्यालय पेटून देऊ शकतो, असा जालना छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. दरम्यान आता काल झालेल्या मारहाणी प्रकरणानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून विजयकुमार घाडगे यांची भेट घेण्याचे म्हटले आहे