Ajit Pawar On Yogesh Kshirsagar : एबी फॉर्मसाठी हट्ट धरला, तू काय पक्षाचा मालक झाला का?

Beed News बीडचे पालकमंत्री अजित पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत . बीडमध्ये झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर थेट टीका करत निशाणा साधलाय . क्षीरसागरांना 35 वर्ष दिली, मला केवळ पाच वर्ष द्या.

त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही ते पाच वर्षात अजित पवार करून दाखवेन, असे आवाहन त्यांनीयावेळी केले. तर याच वेळी योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित दादांनी निशाणा साधला. 53 उमेदवार ठरविण्यासाठी एबी फॉर्म पाठवा, असे त्यांनी म्हटले. मात्र, हे तुझ्या काकाच्या घरचं आहे का? तू काय पक्षाचा मालक झाला का?, असं म्हणत अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना भर सभेतून झापले.