मुळशी प्रतिनिधी :: भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी रविवारी चांदे येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला.
या दरम्यान नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन सादर करत आपली व्यथा मांडली, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार शंकर मांडेकर यांनी सर्वांचे प्रश्न ऐकले आणि संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे तातडीने समाधान करण्याचे निर्देश दिले आहेत.