वाघोली प्रतिनिधी -: प्रशासन व जनता यांचा समन्वय साधूनच विकासाचा आराखडा यशस्वी होतो. नागरिकांचा सहभाग हा विकासाचा कणा असून त्यांच्या सूचनांनुसार काम करण्याचा आमचा निर्धार आहे. असे मत प्रभाग क्रमांक ४, खराडी वाघोलीतील शिवसेनेचे उमेदवार शांताराम कटके यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ (खराडी-वाघोली) मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी सकाळी व संध्याकाळी विविध भागांत पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेनेचे उमेदवार शांताराम बापू कटके यांनी आमदार पुत्र सुरेंद्र पठारे यांचे नाव न घेता सणसडून टीका केली,
ते म्हणाले की 400 ते 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असलेला माणूस आपल्या काही कामाचा नाही त्यामुळे खराडी वाघोली येथील नागरिकांनी आपल्या कामाला येणारा माणूस निवडावा असे आव्हान व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला उमेदवार देखील बक्कळ पैसेवाला आहे; भाजपाने देखील चारशे कोटीवाला दिला आहे, त्यामुळे काम करणारा उमेदवार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला उमेदवारी दिली गटर ड्रेनेज पाणी यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा नगरसेवक म्हणून मी आहे त्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मला आपण संधी द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
