माण हिंजवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला मोठा फटका; जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा
मुळशी प्रतिनिधी – : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हिंजवडी जिल्हा परिषद गटात जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष विशाल विठ्ठल साखरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे, विशेष म्हणजे, ते हिंजवडी माण जिल्हा परिषद गटातून प्रबळ इच्छुक होते.
यावेळी पक्षाला दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, ज्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्या उमेदवाराला प्रचंड विरोध होता स्थानिक गावकऱ्यांनी तो वारंवार भोर राजगड मुळशीचे आमदार मांडेकर यांच्याकडे मांडला होता, मात्र कुठलाही सर्वे न करता कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवारी देण्यात आली त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा आज पक्षाकडे सुपूर्द केला आहे.

मी 2006 पासून या भागात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष वाढण्याच्या ध्येयधोरणाच्या दृष्टीने काम करत आलो मात्र स्थानिक राजकारणामुळे माझा बळी गेला हिंजवडी जिल्हा परिषद गटात मी अनेक लोक हिताची कामे केली मात्र स्थानिक नेतृत्वाने आमचा विचार केला नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.
मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे हे मात्र न करता येणार नाही
