जय गणेश ट्रॅक्टर गॅरेजचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

आमदार शंकरभाऊ मांडेकर व सभापती मंदाताई शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

मुळशी : जय गणेश ट्रॅक्टर गॅरेजचा भव्य उद्घाटन सोहळा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर व मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी जय गणेश ट्रॅक्टर गॅरेज व गवारे परिवार निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी नवउद्योजक मयूर गवारे यांचे अभिनंदन करून त्यांच्या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या उद्घाटन सोहळ्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.