Pune रुपाली चाकणकर यांनी स्वतःवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना थेट क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी स्वतःची तुलना केली आहे . यावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
रुपाली पाटील ठोंबरे असे म्हणाल्या कि,चाकणकर यांना सावित्रीबाईंचे नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा व भोंदूगिरीविरोधात लढा दिला, तर दुसरीकडे महिला आयोगाच्या पदावर असूनही चाकणकर यांनी महिलांचे रक्षण करण्याऐवजी त्यांना भोंदू बाबांच्या हवाली केले, असा थेट आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे .यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे
दरम्यान आपल्यावरील आरोपांना प्रत्युतर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, त्यांच्या चारित्र्यावर निष्कारण डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी ज्या संघर्षाचा सामना केला, तशाच प्रसंगातून आज त्या जात आहेत. महाराष्ट्राची कन्या म्हणून या खोट्या आणि निराधार आरोपांविरुद्ध आपण खंबीरपणे लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर वैयक्तिक आरोपही केले आहेत. चाकणकरांचा वरचा मजला तर कमीच आहे,लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येत नाही असा पलटवार चाकणकर यांच्यावर केला आहे. या दोन प्रमुख महिला नेत्यांमधील या जोरदार आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
