भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रियंका सुदर्शन चौधरी यांची नियुक्ती

पुणे प्रतिनिधी -: पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी पुणे उत्तर मावळ महिला उपाध्यक्षपदी प्रियांका सुदर्शन चौधरी यांची निवड झाली आहे त्यांना आज पुणे येथे पक्ष कार्यालयात निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सायलीताई बोत्रे यांनी आज नियुक्तीपत्र दिले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, जिल्हा उपाध्यक्ष चौधरी जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वातीताई पाचुंदकर, श्रीकृष्णदादा देशमुख, ताराचंद्र कराळे, राणीताई वाकळे, रेश्माताई शेख, अर्चनाताई मासळकर,शोभाताई परदेशी,
सारिकाताई लोणारी, आदि महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून चौधरी कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे.

हवेली पंचायत समितीचे सदस्य तथा पुणे जिल्हा बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी हे देखील एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.

विश्वास सार्थ ठरविणार

नवनिर्वाचित महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रियंकाताई चौधरी म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करणार आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. युवक-युवतींमध्ये अपघात प्रतिबंधक जनजागृती, पक्षाची सभासद नोंदणी वाढविणे आणि युवकांना राजकीय व सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे यावर विशेष भर देणार आहे.