इंदापूरच्या राजकारणातला ‘झंझावात’: अमोल भिसे!​प्रस्थापितांच्या गडाला धडक देणारा एक स्वाभिमानी संघर्ष

​“किनारा मिळावा म्हणून आमची नौका कधीच चालली नाही, > लाटांशी दोन हात करायची जिद्द आमची कधीच संपली नाही! > वादळातही ज्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले, > इतिहास साक्षी आहे, काळानं त्यांची दखल घेतल्याशिवाय सोडलं नाही!”

​इंदापूर तालुक्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अमोल हरिदास भिसे या नावाचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी करावाच लागेल. हा केवळ एक राजकीय प्रवास नाही, तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाचा ‘स्वाभिमान’ आहे.

​वक्तृत्वाचा धगधगता ज्वालामुखी!

​वडील शिक्षक, घरात ज्ञानाचा वारसा, पदरी बी.एस्सी. ॲग्रीची पदवी… अशा सुशिक्षित तरुणाने राजकारणाच्या चिखलात उतरायचे धाडस केले. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते पुणे जिल्हा परिषदेचे ‘गटनेते’ हा प्रवास सोपा नव्हता. ज्या काळात इंदापुरात बड्या प्रस्थापितांची दहशत होती, त्या काळात भिसे यांच्या आवाजाने सभा गाजू लागल्या. त्यांच्या वक्तृत्वात धार होती आणि विचारात स्पष्टता!

​प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपणारी ‘उंची’

​१९९७ ची पंचायत समिती असो वा २००२ ची जिल्हा परिषद, अमोल भिसे यांनी आपल्या कामाची आणि नेतृत्वाची छाप पाडली. पण म्हणतात ना, “वृक्ष जसजसा मोठा होतो, तसतसे कुऱ्हाडीचे घाव त्यावर जास्त पडतात.” राजकारणात भिसेंची वाढती ताकद पाहून अनेकांना पोटशूळ उठला. ज्यांनी समाजाला मोठे केले, त्याच नेतृत्वाचे पाय ओढण्याचे कुटील डाव रचले गेले. जिल्हा परिषदेचे तिकीट कापून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला.

​“हम वो समंदर हैं, जो खामोश तो रह सकते हैं, > मगर तुफान लाना हमारी फितरत में आज भी है!”

​समाजासाठी झिजणारं नेतृत्व!

​अमोल भिसे यांनी केवळ खुर्ची उबवली नाही, तर समाजासाठी संस्था उभ्या केल्या. तरंगवाडीत शाळा काढून गोरगरिबांच्या मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल दिली. डी.एड. झालेल्या शेकडो बेरोजगारांना जिल्हा परिषदेत नोकरीची संधी मिळवून दिली. धनगर समाजाची अस्मिता असलेल्या ‘बाबीर बुवा’ यात्रेला ‘गजढोल’ नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवणारा हा वाघ आजही आपल्या तत्त्वाशी तडजोड करायला तयार नाही.

​आजचा शांत काळ… उद्याच्या वादळाची नांदी!
​आज अमोल भिसे यांचा प्रवास संथ वाटत असला, तर तो थांबलेला नाही. ही एका मोठ्या शिकारीपूर्वीची शांतता आहे. ज्या नेतृत्वाने आपल्या मुलांना डॉक्टर केले, स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले, ते नेतृत्व आज शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून संघर्षाची नवी मशाल पेटवत आहे.

​“मंजिलें उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, > पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है!”

​इंदापूरच्या जनतेने आणि तरुण पिढीने हे ओळखलं पाहिजे की, कुटील नीती आणि राजकारणातील बेड्या तोडून पुन्हा एकदा संघर्षाचं ‘वस्त्रहरण’ करण्यासाठी सज्ज व्हा!

शशिकांत तरंगे