माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुरेश हुलावळे, आनंदा घोगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले जिवाचे रान
मुळशी प्रतिनिधी – : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात भाजपची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण मांडेकर यांच्या घरचे मैदान असणाऱ्या हिंजवडी गटात भाजपचे शिवाजी बुचडे तर हिंजवडी गणात ऐश्वर्या वाघमारेहे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
माणमध्ये मंदा शेळके विजयी
माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा शेळके यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 5997 मंतं मिळाली तर, भाजपच्या युगंधरा पारखी यांना युगंधरा पारखी 33O5 मतं मिळाली. ठाकरे गटाच्या कल्पना भेगडे यांना 3521 मतं मिळाली. तर, अपक्ष रुपाली बोडके यांनी चांगली लढत दिली त्यांना 3670 मतं मिळाली.
मात्र आमदार शंकर मांडेकर हे याच भागातून जिल्हा परिषदेसाठी विजयी झाले होते, त्यांच्याच होम ग्राउंड वर हा पराभव निश्चित जिव्हारी लागणार आहे, मुळशी तालुक्यातील हिंजवडी माण भागातील अनेक दिग्गजांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केले होते.
मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, मुळशी तालुक्याचे नेते सुरेश हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई हुलावळे, घोटावडे गावचे माजी सरपंच आनंदा घोगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करत आमदार मांडेकर यांना रोखण्यासाठी योग्य नियोजन आखत माण हिंजवडी जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा फडकवण्यामध्ये यांनी खूप कष्ट घेतल्याचे दिसून आले होते अखेर त्यांना देखील मोठे यश आले असे म्हणता येईल.
भाजपाच्या या विजयामुळे विधानसभेचे चित्र बदलणार मांडेकरांची डोकेदुखी वाढणार
माण हिंजवडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे शिवाजी बुचडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सागर साखरेचा तब्बल 2000 हजार मतांनी पराभव केला, मात्र हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भोर वेल्हा व मुळशी विधानसभा मतदार संघाची विभाजन होऊन मुळशी तालुका हा वेगळा होऊ शकतो यामुळे भारतीय जनता पक्षाच्यावतीने निश्चितपणे भविष्यकाळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात ताकद देतील असे देखील राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे त्यामुळे भविष्यात मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप देखील तेवढ्याच सक्षमपणे उतरताना दिसून येईल.
पौड अंबटवेटमध्ये घड्याळाचा गजर
पौड-अंबटवेट गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल मोरे या 2145 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माजी सभापती कोमल वाशिवले यांचा पराभव केला. काजल मोरे यांना 6143 तर, कोमल वाशिवले यांना 3998, पल्लवी कंधारे यांना 3213 मतं मिळाली.
जिल्हा परिषद गटात सुरुवातीच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मिलिंद वाळुंज सुरुवातीच्या कलापासून आघाडीवर होते. त्यांनी ठाकरेंचे उमेदवार अविनाश बलकवडे यांचा 5 हजार 297 मतांनी पराभव केला.
