पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटात ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का: तालुका उपप्रमुखाचा राजीनामा

ठाकरे सेनेच्या उमेदवाराने माझ्यावर पैसे वाटपाचा तथ्यहीन ट्रॅप रचला – अ‌ॅड.आबासाहेब मरवडी

मुळशी प्रतिनिधी -: राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा जिल्हा परिषद गटात ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का मिळाला आहे;

युवासेना उप तालुकाप्रमुख अ‌ॅड.आबासाहेब दत्तु मरवडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहेत.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की शिवसेनेने दिलेले उमेदवार अत्यंत निष्क्रिय असल्यामुळे मी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त होतो मात्र मी पक्षाचे काम करत नसल्यामुळे काल माझ्यावर ट्रॅप रचून पैसे वाटपाचा आरोप केला या क्लेशदायी घटनेमुळे मी युवासेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अविनाश बलकवडे यांच्यावर थेट आरोप केले अविनाश बलकवडे हा निष्क्रिय माणूस आहे पक्षाने यांना उमेदवारी दिली; पराभव समोर दिसत असल्यामुळे माझ्यावर जाणीवपूर्वक ट्रॅप रचला गेला गुंडांना हाताशी धरत गुंडांकडे पैसे देऊन माझ्यावरती हल्ला केला मला हा मारहाण करण्यात आली असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडून येण्यापूर्वीच वकिलाला मारहाण करण्याइतकी तुमची मजल गेली; निवडून आल्यावर सर्वत्र गुंडाराज होईल

मी लग्नपत्रिका वाटत असताना जाणीवपूर्वक पक्षाचे काम करत नाही म्हणून मारहाण करत पैसे अंगावर फेकत आरोप करून माझी नाहक बदनामी केली व सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत आहे असे दाखवले गेले एवढ्या वर्ष मी बाळासाहेबांच्या विचाराने पक्षात काम करत आलो मात्र एका घातकी माणसांमुळे मला आज पक्ष सोडावा लागत आहे, अविनाश बलकवडे हे उच्चशिक्षित असल्याचा आव आणतो गुंडांना सोबत घेऊन गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराला मत देऊ नका अशी देखील आव्हान यावेळी त्यांनी पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील नागरिकांना केले आहे.