माण–हिंजवडी गटातील प्रलंबित विकासकामांसाठी ५० कोटींचा निधी देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

माण–हिंजवडी एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लावणार : शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे

हिंजवडी | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा समजला जाणारा माण–हिंजवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना दणदणीत विजय मिळवेल आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल, असा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब साखरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी उदय सामंत म्हणाले की, माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करूनत दिला जाईल. तसेच माण–हिंजवडी एमआयडीसीचे रखडलेले प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी बाबासाहेब साखरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच मुळशी पंचायत समिती ताब्यात आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे म्हणाले की शिवसेनेच्या उमेदवाराला सभागृहात पाठवा निश्चित आपल्या भागाचा विकास महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब सोडवतील शिंदे साहेबांचे काम सर्व महाराष्ट्राने पाहिलेले आहे त्यामुळे आपल्याला चिंता करायचे कारण नाही निश्चितपणे प्रलंबित प्रश्न हे सुटणार आहेत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.