हिंजवडी प्रतिनिधी -: पुणे जिल्ह्यातील मुळशी पंचायत समिती अत्यंत महत्त्वाची समजली जाते, याच पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसापूर्वीच वाजले होते येत्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान पार पडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर 69 माण पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.
नात्यागोत्याचे समीकरण ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते असे देखील बोलले जात आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी यांनी देखील आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येते.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांनी देखील डोअर टू डोअर प्रचार करत प्रत्येक मतदारांशी त्या वैयक्तिकरित्या भेट घेत आपुलकीने चौकशी करून भावनिकतेने मतदान मागताना दिसून आले आहेत.

माण पंचायत समिती गणातील अनेक गावांमधील नात्यागोत्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ.युगंधरा नवनाथ पारखी यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच नवनाथ पारखी फाउंडेशनच्या वतीने त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषद गटात विविध उपक्रम राबवले होते प्रत्येक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक घटकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला दिसून आला होता याचा देखील या निवडणुकीत त्यांना मोठा फायदा होईल असे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
