खेड शिवापुर खानापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतोय मोठा जनाधार

राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ.पूजा नवनाथ पारगेनीं घेतली प्रचारात आघाडी

खानापूर प्रतिनिधी -: खेड शिवापुर खानापूर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वातावरण पोषक पाहायला मिळताना दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार पूजाताई नवनाथ पारगे, 83 खेड शिवापुर पंचायत समिती गणच्या उमेदवार अश्विनी राजेश डिंबळे – व 84 खानापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार युवराज वांजळे यांनी डोअर टू डोअर प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या तिघांनाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मायक्रो प्लॅनिंग करत थेट मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ते यशस्वी ठरलेले दिसून येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे प्रचार यंत्रणा काहीशी ठप्प झाली होती मात्र उपमुख्यमंत्री अजित दादांचे विचार तळागाळात नेण्यासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी पुन्हा प्रचारात सक्रिय होत, नागरिकांनी देखील मोठा आधार दिला मतदारांच्या मनात आजही अजितदादा विचार जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मोठी सहानुभूती मिळेल असे देखील राजकीय विश्लेषकाकडून सांगितले जात आहे.

निश्चितच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खेड शिवापूर खानापूर मतदारसंघातील व पंचायत समिती गणातील उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला.