ZP Election Date Updates: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत मोठा बदल, नवीन तारखा पाहा

Pune News राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

दुखवट्यामुळे वेळापत्रकात बदल –

राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी या निवडणुकांचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे आणि चिन्ह वाटप यांसारख्या प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्या आहेत.

मात्र, २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्र्यांचे अपघाती निधन झाल्याने २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा पाळला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असली, तरी सद्यस्थितीचा विचार करून आयोगाने दोन दिवसांचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रचारासाठी अतिरिक्त वेळ –

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदानाचा दिवस दोन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. परिणामी, उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी ५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंतची मुदत मिळणार आहे.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.

असे असेल सुधारित वेळापत्रक:टप्पाजुनी तारीखनवीन तारीख प्रचार समाप्ती ३ फेब्रुवारी ५ फेब्रुवारी (रात्री १० वा.) मतदान ५ फेब्रुवारी ७ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०) मतमोजणी ७ फेब्रुवारी ९ फेब्रुवारी (सकाळी १० वाजल्यापासून) राजपत्रात प्रसिद्धी ९ फेब्रुवारी ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत