Pune महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता झालेल्या विमान अपघातात बारामतीत मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राज्यभरात शोक पसरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत सांगितलं. राज्यात सुट्टी आणि तीन दिवसांच्या दुखवटा त्यांनी जाहीर केला. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा तीन दिवस बंद असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar Death)
महाराष्ट्रात तीन दिवस राजकीय दुखवटा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२८ जानेवारी २०२६) राज्यात शासकीय सुट्टी आणि तीन दिवस दुखवट्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ आज २८ जानेवारी रोजी राज्य सरकारचे सर्व कार्यलयं बंद राहतील. याशिवाय महाराष्ट्रात तीन दिवस राजकीय दुखवटा असेल. २९ आणि ३० जानेवारी रोजी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयं सुरू असतील. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
