माण पंचायत समिती गणात राष्ट्रवादी व भाजपात तुल्यबळ लढत होण्याच्या मार्गावर

भाजपाच्या युगंधरा पारखी व राष्ट्रवादीच्या मंदाताई शेळके यांच्यातच सामना रंगणार

हिंजवडी प्रतिनिधी -: पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंजवडी जिल्हा परिषद गटातील माण हिंजवडी गणातील सर्वच उमेदवारांनी आपापला जोर कायम ठेवला आहे; प्रचार यंत्रणेवर मोठा भर दिला आहे मतदारांच्या भेटीसाठी वाडी वस्ती डोअर टू डोअर प्रचार करताना उमेदवार दिसून येत आहेत.

भारतीय जनता पक्षातून जिल्हा परिषदेसाठी शिवाजी बुचडे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सागर साखरे यांना उमेदवारी दिली तर ठाकरे शिवसेनेने नागेश साखरे यांना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाबासाहेब साखरे यांना मैदानात उतरवले; काँग्रेसने देखील राहुल जाधव सारख्या नवख्या तरुणाला या रिंगणात उतरवले.

माण पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने युगंधरा पारखी व राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंदाताई शेळके यांना रिंगणात उतरवले गेले.

युगंधरा पारखी यांनी प्रचार चांगलीच आघाडी घेतल्याची दिसून येते; पारखीसाठी सोसायटी वर्ग आरएसएस देखील थेट मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

नवीन स्वच्छ व पारदर्शी चेहऱ्यामुळे त्यांना या भागातून मोठा जनप्रतिसात मिळताना दिसून येत आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी म्हणाले की प्रचारादरम्यान उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विकासकामांचा लेखाजोखा मांडत पुढील काळातील आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात येत आहे. “राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असावे,” हा संदेश देत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जनतेशी जोडले आहेत.

माण हिंजवडी समिती गणातील उमेदवार हे अभ्यासू व जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे असल्याचे सांगितले. “जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. हा विश्वासच आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देईल,” असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.