जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा नवनाथ पारगे यांचा उमेदवारी अर्ज दिमाखात दाखल
हवेली प्रतिनिधी -: आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजाताई नवनाथ पारगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या गटातील निवडणूक लढतीला स्पष्ट दिशा मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
डोणजे येथील संपर्क कार्यालयातून गावचे ग्रामदैवत अमृतेश्वर मंदिर, खानापूर येथील श्री.भैरवनाथ ग्रामदैवत, बहुली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे व कोंढणपूर येथील.श्री तुकाईमाता दर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत परिसरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी सदस्य माजी सरपंच उपसरपंच कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पारगे यांनी पूर्ण तयारीने मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे चित्र दिसून आले.
शिस्त, संघटन, कामाचा अनुभव यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या वेळी आपल्या भागाच्या विकासासाठी करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणण्यात पूजा पारगे यांना मोठे यश आले होते,
त्याची पक्षाने दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अत्यंत महत्त्वाच्या खात्यावर त्यांची सभापती पदी वर्णी लावली त्यानंतर त्यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध योजना राबवल्या होत्या.
यावेळी पूजाताई पारगे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो, पाणीपुरवठा,शेती, शेतीसाठी बंधारे, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित रोजगार व शेतकरी प्रश्न, गावठाण विस्तार, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक भर दिला जातो, आजपर्यंत यासाठी सर्वसामान्य जनतेला घेऊन नेहमीच काम केले आहे, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिसराचा भक्कमपणे विकास साधण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खेड शिवापुर खानापूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचारात वेग घेत असून, पूजाताई नवनाथ पारगे यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
