प्रभागाच्या विकासासाठी नियोजनबद्ध विकासकामे करण्याचा अतुल तरवडेंचा शब्द

हडपसर प्रतिनिधी : पुणे शहरातील  प्रभाग क्रमांक 41 उंड्री, पिसोळी, मंमदवाडी, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री.अतुल तरवडे यांनी प्रचारात वेग घेतल्याने, महिलांसह, ज्येष्ठ नागरिक, सोसायटी वर्ग, आयटी हंस, स्थानिक रहिवासी मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा.

 ४१ भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जीवन बाप्पू जाधव, अतुल नारायण तरवडे, स्नेहल गणपत दगडे, प्राची आशिष आल्हाट उमेदवारांनी भागातील अनेक भागांमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधला.

रॅलीदरम्यान ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले

यावेळी महिलांनी आपल्या दैनंदिन समस्यांबाबत खुलेपणाने मते मांडली. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची अवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यांसह अनेक समस्या आजवर तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीने गांभीर्याने सोडविल्या नसल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

मागील २० वर्ष नगरसेवकांनी ही कामे केलेली नाहीत

जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही झगडत असून माझ्या प्रभागातील महमंदवाडी गाव व त्यालगतच्या बारा वाड्यावस्त्यांचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट असून रात्री-आपरात्री नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, यावर आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करणार आहोत 

महिलांच्या समस्यांकडे गांभीर्याने तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रभागातील मुलगी आणि बहीण या नात्याने तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर ठोस उपाययोजना राबविल्या जातील. महिलांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर विशेष लक्ष दिले जाईल.

अतुल नारायण तरवडे

उमेदवार भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. 41 उंड्री, पिसोळी, मंमदवाडी