भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ हुलावळे यांचा पुढाकार
हिंजवडी प्रतिनिधी -: हृदय, मूत्रपिंड, यकृत यांसारख्या
अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी सध्या रुग्णांना 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, आता सुरेशभाऊ हुलावळे फाउंडेशनच्या वतीने अंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होणार आहे.
हिंजवडी जिल्हा परिषद गटातील व मुळशी तालुक्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान हुलावळे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना 5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारा जादा खर्चही विशेष निधीतून भरला जाणार
हजारो रुग्णांना दर वर्षी अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, लाखोंच्या घरातील खर्चामुळे हे उपचार विशिष्ट आर्थिक वर्गापुरतेच मर्यादित होते. आता महात्मा फुले योजनेत यांचा समावेश झाल्याने सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील प्रत्यारोपण प्रक्रियांना वेग मिळेल आणि मृत्युदरही कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.
