नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रभाग क्र. ४० मध्ये पदयात्रा
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी, पुणे महानगरपालिका निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी–कात्रज) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला गती दिली.
सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत स्वामी समर्थ नगर व प्रतिक नगर परिसरात पदयात्रा पार पडली, तर सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत शिवशंभो नगर व गुरु रविदास नगर परिसरात उत्स्फूर्त वातावरणात प्रचार पदयात्रा राबवण्यात आली.
या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेश लक्ष्मण कवडे, सौ. वर्षा सतीश मारकड, सौ. सपना अमोल धर्मावत व श्री. गंगाधर विठ्ठल बधे यांनी विविध ठिकाणी भेटी देत घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या.
प्रभागातील विकासकामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवली जातील, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. प्रत्येक कामासाठी स्पष्ट नियोजन, वेळबद्ध अंमलबजावणी आणि पारदर्शकता राखली जाईल. नागरिकांच्या सहभागातून प्राधान्यक्रम ठरवून पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
या पदयात्रेत सागर शर्मा, नितीन हिरावत, मधुकर नाना मरळ, राजाभाऊ कामठे, शरद बधे, शिवाजी बधे, माऊली कामठे, नितीन गायकवाड, तानाजी डेंभे, चंचल दरेकर, विश्वराज तात्या वाघमोडे, विभीषण खरात, सुदाम खरात, श्रेयस शिंदे, साईराज कामठे, वेतन कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक ४० मध्ये केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामावर आधारित विकास मॉडेल राबवले जाईल. नागरिकांचा सहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून प्रभागाचा समतोल व शाश्वत विकास साधण्याचा आमचा संकल्प असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले.
