पुणे प्रतिनिधी -: पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी प्रचारावर जोर दिला आहे. दिवस रात्र राजकीय पक्षांच्या सभा, दौरे, प्रचार सुर आहे. अशातच बदलत्या काळानुसार प्रचाराची पद्धतही बऱ्याचअंशी बदलेली पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा प्रल्हाद सायकर प्रभाग क्रमांक 9 चे माजी नगरसेविका स्वप्नाली ताई सायकर ह्या देखील या प्रभागातून प्रबळ इच्छुक होत्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही देखील या प्रभागासाठी विकासाची गंगा वाहिली होती मात्र पक्षाने काही निर्णय घेतला तर तो मान्य करावा लागतो भविष्यकाळ देखील आपलाच आहे हे देखील विसरता येणार नाही असा टोला त्यांनी अमोल बालवडकर यांचे नाव न घेता लगावला.
भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार मोठा मताधिक्याने विजयी होतील व चंद्रकांत दादा पाटील मुरली अण्णा मोहोळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 34 पानांचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आला अशी देखील माहिती प्रल्हाद सायकर यांनी दिली.
