प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वाट बिकट

नाना भानगिरेऱ्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल मुसंडी मारण्याच्या तयारीत

हडपसर प्रतिनिधी :: राज्यात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला आहे. सत्ताधारी गटात मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वच मंत्री प्रचाराला लागले आहे.

तर विरोधकही आपल्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा सुरू करण्याचा धडाका सुरू केला आहे

प्रभाग क्रमांक 41 मध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेची तिरंगी लढत पाहायला मिळत आहे, या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बॅक फुटवर गेलेली पाहायला मिळते, नगरसेवक फारुक इनामदार हे त्या प्रभागाचे पॅनल प्रमुख होते मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण पॅनल विषयी निगेटिव्ह वातावरण तयार झाले आहे विरोधकांनी देखील गुंडगिरी गतींगशाही करणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ नका असे आयते कोलीत त्यांना प्रचारला मिळाले आहे.

शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समर्थक तथा शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी संपूर्ण पॅनल विजय करण्यासाठी आपले तन मन धन लावलेले दिसून येते प्रचाराची संपूर्ण यंत्रणा राबवण्यात नाना भानगिरे यशस्वी ठरलेले आहेत.