शिवसेनेचे शांताराम कटकेंचे राष्ट्रवादी भाजपला मोठे आव्हान
खराडी प्रतिनिधी -: पुणे महापालिका निवडणुकीत वाघोली खराडी असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये अतिशय इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळत आहे.
या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून जाणारा असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची, तिरंगी लढत होणार आहे.
मतदारांचा मूड आणि अटीतटीची शक्यता
प्रभागातील मतदार संमिश्र असल्याने कोणत्याही एका पक्षाचे एकहाती वर्चस्व नाही. वैयक्तिक लोकप्रियता, स्थानिक कामे आणि पक्षीय युती यावर निकाल अवलंबून राहील. मागील निवडणुकांमध्ये येथे राष्ट्रवादी आणि भाजपची चांगली ताकद होती, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शांताराम बापू कटके यांना पक्षात घेऊन त्यांना तिथे तिकीट दिले आहे. हा त्यांचा पारंपारिक प्रभाग आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे शिवसेनेचे तगडे आव्हान मिळाले आहे.
स्थानिक मुद्दे आणि विकासाच्या अपेक्षा
या प्रभागात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, नगर रोडवरील ट्रॅफिक जाम, उड्डाणपूल आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रमुख मुद्दे आहेत. मागील काही वर्षांत चौकातील रस्ते आणि विकासावरून ज्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरही केंद्रीत राहिल.
शांताराम बापू कटके यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासन नियुक्त नगरसेवक पदी वर्णी लागल्यानंतर करोडो रुपयांचा विकास निधी आपल्या भागासाठी खेचून आणला होता वाघोली खराडी भागांमध्ये त्यांनी आपला मोठा जनसंपर्क वाढवला हीच त्यांची जमेची बाजू ठरू शकते.
नात्यागोत्याच्या राजकारणात देखील त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेने देखील त्यांची संपूर्ण ताकद कटके यांच्या पाठीमागे उभे केल्याची दिसून येत आहे त्यामुळे सुरेंद्र पठारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
