राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीत पराजय दिसू लागल्याने पैशाचे वाटप सुरू – माजी महापौर राहुल जाधव यांचे टीका
मोशी प्रतिनिधी -: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महानगरपालिका निवडणुकीला मोशी प्रभाग क्र 2 मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये दुपारीच स्वराज रेसिडेन्सी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार वसंत बोराटे यांचे बंधू सागर बोराटे यांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते, त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई कारवाई करत संबंधित गाडी पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे नेमके अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभवाच्या भीतीला सामोरे जात असल्यामुळे पैशाच्या वाटप होत आहे टीका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुलदादा जाधव यांनी केली.
प्रभाग क्रमांक ड मधून मी स्वतः उमेदवारी भरावी म्हणून वसंत बोराटे यांचा आग्रह होता मात्र माझ्या काही कारणास्तव मी तो भरला नाही मात्र आमच्या नव्या दमाचा तरुण निखिल बोऱ्हाडेनें तुम्हाला घाम फोडला हे आजच्या घटनेवरून लक्षात येते अशी देखील टीका जाधव यांनी केली.
यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन तात्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी देखील विनंती जाधव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
