पक्षाने नाकारले जनतेने तारले ; प्रभाग क्र 33 मध्ये ‘छत्री’ची चर्चा! राहुल पोकळेच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ; मतदारांचा मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

पुणे प्रतिनिधी -:Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सत्ताधारी पक्षाने विरोधकांना चांगलेच धक्के दिले.

प्रभाग 33 मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे राहुल पोकळे यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून पक्ष वाढवण्यासाठी व जनतेत मिळून मिसळून राहुल पोकळे यांनी महापालिकेची तयारी केली होती प्रत्येक मतदाराशी ते वैयक्तिकरित्या भेटून त्यांच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या मात्र स्थानिक राजकारणामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी कट केली मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी आपला फॉर्म कायम अपक्ष ठेवला आज त्यांना छत्री चिन्ह मिळाले त्यामुळे कार्यकर्त्यात मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले

राहुल पोकळे हे प्रभाग 33 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून, त्यांना ‘छत्री’ (Umbrella) हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात प्रचार फेरी काढली. “प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला ‘छत्री’ या चिन्हासमोर बटण दाबून विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

प्रचार फेरी दरम्यान महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार पोकळे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. अपक्ष असूनही त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.