News Pune Bjp – पुणे महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत आहे. उमेदवारीसाठी नेत्यांनी रांगा लावल्या आहेत, शहरात अनेकजण इच्छुक आहेत.
पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषांगाने घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.
त्याचबरोबर त्यांच्या जागेवर लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत थेट देवेंद्र फडणवीसांकडे गाऱ्हाण मांडलं होतं आणि कोथरूडमधून आमदारकीसाठी उमेदवारी देण्यासाठी हट्ट धरला होता. त्यानंतर आता अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांची उमेदवारी भाजपनेच नाकारली आहे. त्यामुळे लहू बालवडकर यांची लॉटरी लागली आहे.
कोण आहेत लहू बालवडकर
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अत्यंत संयमी चेहरा उच्चशिक्षित सर्वांशी आदरयुक्त आदर करणारा – नात्यागोत्याचा मोठा समूह असलेला उमेदवार म्हणून लहू बालवडकर यांच्याकडे पाहिले जाते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोथरूड मंडलच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पक्ष विस्तारासाठी मोठी मेहनत त्यांनी केली पक्षाचे हिताचे निर्णय घेण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.
