पुण्यात अजित पवारांचा भाजपाला मोठा धक्का भाजपाचा नेता राष्ट्रवादीच्या कळाला 

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पहिला दणका बसलेला आहे. भाजपचे नेते धनंजय जाधव हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, परंतु भाजपने नकार दिल्यानंतर त्यांनी अजित पवार यांचे घड्याळ मनगटावर बांधण्याची तयारी दर्शवली.

पुणे महानगर पालिका निवडणूक भारतीय जनता पक्षातून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. धनंजय जाधव यांना प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती मधून उमेदवारी मिळावी, यासाठी ते इच्छुक होते. परंतु पक्षाने उमेदवारीसाठी असमर्थता दर्शविल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.

जागा वाटपानंतर भाजपमधून पहिली बंडखोरी

धनंजय जाधव यांच्या रुपाने पुण्यात भाजपमधून पहिली बंडखोरी झाली. जागा वाटपानंतर भाजपमधून होणारी बंडखोरी समोर आली. धनंजय जाधव यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भाजपमधून तिकीट डावलल्याने धनंजय जाधव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

भाजपने उमेदवारी न दिल्याने धनंजय जाधव यांच्या डोळ्यात अश्रू

प्रबळ दावेदार असतानाही मला तिकीट दिले नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे, ज्याला कुणी ओळखत नाही त्याला पक्षाने तिकीट दिले. भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत असेल तर गप्प बसणार नाही, असे धनंजय जाधव म्हणाले. आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.