Pune उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाही अद्याप उमेदवाऱ्या निश्चित न झाल्याने इच्छुकांची चांगलीच घालमेल होतानाचे चित्र दिसून येते. त्यातच, मुंबई आणि पुण्यातील महापालिका (Mahapalika) निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले असून मुंबई आणि पुण्यात इच्छुक नाराज उमेदवारांकडून ऐनवेळी पक्षांतर केले जात आहे.
अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीकूडन काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आलाय. काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून अजित पवारांच्या बंगल्यावर ते दाखल झाले आहेत.
दत्ता बहिरट हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, दत्ता बहिरट यांनी लढवली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हेही अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते पोहोचले असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जागावाटप आणि उमेदवारांबाबत त्यांची चर्चा होत आहे.
