Pune News – महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, बैठका, स्नेहमेळावे आणि प्रचार फेऱ्यांमुळे प्रभागात निवडणूक वातावरण तापू लागले असतानाच, प्रचारादरम्यान एका वेगळ्याच मुद्द्याची सातत्याने चर्चा होताना दिसत आहे,ती म्हणजे बाबुराव चांदेरे यांच्या माध्यमातून झालेल्या डीपी रोड पाणी प्रश्नी व प्रभागातील विविध सोडवलेल्या समस्या या केंद्रस्थानी ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर समीर चांदेरे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी केवळ प्रचारापुरते न थांबता, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली उपस्थिती ठळक केली आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या परिसरात घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधताना, अनेक ठिकाणचे पाणी प्रश्न नागरिकांना भेडसावत असणारे नागरी प्रश्न ‘ते विषय आपसूकच चर्चेत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या अंतर्गत पातळीवरही प्रभाग क्रमांक ९ संदर्भात पर्यायांचा आढावा सुरू आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले, सातत्याने जनसंपर्क ठेवणारे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारे चेहरे पक्षाच्या विचाराधीन असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर बाबुराव चांदेरे सह अनेक नाव चर्चेत येत असल्याचे बोलले जात आहे. प्रचाराच्या धावपळीत जिथे बहुतांश उमेदवार सभा, बैठक आणि घोषणांवर भर देताना दिसत आहेत, तिथे पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे डीपी रोड बाणेर सुस पाषाण महाळुंगेतील पाणी प्रश्न रस्ते व विविध अनेक उपक्रमामुळे उपक्रमामुळे निर्माण झालेली सकारात्मक चर्चा प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
