Pune News – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. देसमुख प्रकरणात विशेष मकोका न्यायालयात आरोपींवर चार्ज फ्रेम झाला आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याचा मावसभाऊ आरोपी विष्णू चाटे याचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहे.
आरोपींवर नेमके कोणते आरोप निश्चित केले?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड , विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे , महेश केदार, जयराम चाटे यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे.खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिवीगाळ, कंपनीचे नुकसान अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित केले आहेत. यात पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे वाल्मिक कराड सर्व आरोपींना धक्का समजला जात आहे.
