प्रशासनाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर शाळा सुरू; Aryan World School प्रकरणी गुन्हा दाखल

PUNE AryanWorldSchool पुणे : बेकायदेशीर पद्धतीने शाळा सुरु ठेवून तब्बल 567 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन फी आकारणी करीत पालक, विद्यार्थी आणि शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नऱ्हे येथील आर्यन वर्ल्ड स्कुलच्या संचालकांवर नऱ्हे पोलीस ठाण्यात भान्यासं ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ०७ऑगस्ट २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला.

प्रणव मिलिंद लडगे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश बाळासाहेब उचाळे (वय ४५, रा. यशराज अव्हेन्यु, भेकराई नगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

नऱ्हे येथील आर. के. हॉटेल समोर एलोरा मेडीकल अॅण्ड एज्युकेशन फौंडेशन संस्थेचे आर्यन वर्ल्ड स्कुल आहे. या शाळेत आरोपींनी इयत्ता १ लीच्या १२३, इयत्ता २ रीच्या ११०, इयत्ता ३ रीच्या १३६, इयत्ता ४ थीच्या १०२, इयत्ता ५ वीच्या ८२ व इयत्ता ६ वीच्या १४ अशा एकूण ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.

शाळा सुरू करून मुलांकडून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक शुल्क आकारण्यात आले. दरम्यान, आरोपींनी ०९ जुलै २०२५ रोजी शासनास एक प्रस्ताव सादर केलेला होता. त्यामध्ये माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे शाळा बंद केल्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचे समायोजन भिलारेवाडी शाखेत केल्याबाबत हमीपत्र दिले होते.

तरीदेखील शाळा सुरु ठेवून शाळेला मान्यता प्रमाणपत्र नसताना शैक्षणिक शुल्काची आकारणी केली. अशा प्रकारे पालकांची, विद्यार्थ्यांची व शासनाची अर्थिक फसवणूक केली.

AryanWorldSchool