सर्व सामान्याला आनंदाची बातमी सीएनजीसह पीएनजी स्वस्त होणार

Pune cng news 

आगामी नवीन वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅस (PNG) च्या किमती कमी होणार आहेत.

1 जानेवारी 2026 पासून लागू किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. एका विशेष मुलाखतीत PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी म्हणाले यांनी, नवीन टॅरिफ रचनेमुळे प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची बचत होणार आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवीन युनिफाईड टॅरिफ स्ट्रक्चर

PNGRB ने नवीन यनिफाईड टॅरिफ स्ट्रक्चरची घोषणा केली आहे. यात झोनची संख्या तीनवरून दोन करण्यात आली असल्याने टॅरिफ सिस्टम सोपी झाली आहे. 2023 मध्ये अंतरावर आधारित तीन झोन तयार करण्यात आले होते. यात 200 किलोमीटरपर्यंतसाठी 42 रुपये, 300 ते 1200 किलोमीटरसाठी 80 रुपये आणि 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 107 रुपये टॅरिफ होते. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. ए. के. तिवारी यांनी सांगितले की, ‘आम्ही दरांचे तर्कसंगतीकरण केले आहे. आता तीन ऐवजी 2 झोन असणार आहेत. पहिला झोन संपूर्ण भारतातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांना लागू होईल. झोन 1 साठी 54 रुपये टॅरिफ असणार आहे, जे आधी 80 आणि 107 रुपये होते.